Ad will apear here
Next
‘शेंटिमेंटल’चा ‘टीझर’ प्रदर्शित
कोल्हापूर : ‘पोस्टर बॉइज’ आणि ‘पोस्टर गर्ल’मुळे हसता हसता ‘सेंटिमेंटल’ करणारा लेखक आणि दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे. अशोक सराफ यांना दिलेल्या पोस्टररूपी आगळ्यावेगळ्या शुभेच्छांमुळे त्यांच्या नवीन ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टीझर’मुळे समीर पाटील यांनी यंदाच्या मान्सूनमध्ये पुन्हा एकदा तुफान मनोरंजनाचा तडका प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे याची खात्री पटते. 

अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजूषा बोडके निर्मित आणि आर. आर. पी. कॉर्पोरेशन, डॉ. अंबरीश दारक, बनी डालमिया प्रस्तुत ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटातून मराठी सिनेमा ‘फर्स्ट टाइम’ बिहारला पोहोचणार असून, महाराष्ट्र पोलिसांच्या एका ‘इंटर-स्टेट ऑपरेशन’ची ‘इंटरेस्टिंग’ कथा या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे.

अशोक सराफ यांच्यासोबतच उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, देवयानी यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे आणि विद्याधर जोशी यांची ‘फुल टू कॉमिक अॅक्शन’ असणारा हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टीझर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZFBBD
Similar Posts
‘शेंटीमेंटलमुळे’ महाराष्ट्र होणार हसून हसून ‘मेंटल!’ कोल्हापूर : ‘पोस्टर बोइज’ आणि ‘पोस्टर गर्ल’ या धमाल ‘मॅड कॉमेडी’ चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्र गाजवल्यानंतर समीर पाटील आता ‘शेंटीमेंटल’ या नवीन चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना हसून हसून मेंटल बनवायला सज्ज झाले आहेत. सामाजिक प्रश्नांवर विनोदी शैलीत भाष्य करणारा दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे
कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज आणि ‘दी आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, ‘बी. व्होक. अँड कम्युनिटी कॉलेज’चे समन्वयक सतीश गायकवाड, प्रमुख पाहुण्या अक्षया बोरकर, अॅडव्होकेट गौरी भावे,
वीर सेवा दलातर्फे पशुसंवर्धन आयुक्तांची भेट कोल्हापूर : येथील वीर सेवा दल जिल्हा व तालुका समितीतर्फे पशु संवर्धनाच्या विविध समस्यांसंदर्भात पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांची भेट घेऊन समस्यांचे निवारण करण्याची मागणी केली. गीर गोवंशाच्या ‘सिमेन’चा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याने या भेटीत ती मागणी प्रामुख्याने करण्यात आली. पशू आहार,
‘समाजोपयोगी संशोधनावर भर द्यावा’ पुणे : ‘शहराची वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहने यामुळे प्रदुषणाची समस्या गंभीर होत आहे. यावर उपाय करण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने विकसित व्हायला हवीत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधन करावे. आपल्या संशोधनाचा फायदा समाजाच्या उपयोगाला आला पाहिजे, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे,’ असे मत सावित्रीबाई

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language